अमित शहा शनिवारी नगरमध्ये; सहकार मंत्रिपद मिळाल्याची 'अशी' करणार इच्छापूर्ती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 13, 2021

अमित शहा शनिवारी नगरमध्ये; सहकार मंत्रिपद मिळाल्याची 'अशी' करणार इच्छापूर्ती

https://ift.tt/3oLs2C4
अहमदनगर: सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह () शनिवारी (१८ डिसेंबर) येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती भाजपाचे जेष्‍ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील () यांनी दिली. पहिले सहकार मंत्री झाल्‍यानंतर शाह यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती, त्यानुसार ते येत असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. मागील महिन्यात शहा पुण्यात येणार होते. त्यावेळी त्यांचा नगर जिल्ह्यातही दौरा होणार होता. मात्र, तो अचानक रद्द झाला. त्यानंतर आता १८ डिसेंबरला ते नगर जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्‍था क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित राहणार असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले. वाचा: या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रवरानगर येथील कामगार सांस्‍कृतिक भवनात तालुक्‍यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर उपस्थित होते. वाचा: विखे पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्‍थापना केली. मंत्री अमित शाह यांच्‍याकडे या विभागाचा कार्यभार सुपूर्द करण्‍यात आला. सहकार चळवळीच्‍या दृष्‍टीने ही ऐतिहासिक बाब ठरली आहे. सहकार मंत्री झाल्‍यानंतर शाह यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. त्यानुसार ते येत असून प्रवरा परिसराच्‍या दृष्‍टीने हा एक सुवर्णक्षण आहे. सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर सेवा सहकारी सोसायटीपासून ते कारखानदारीपर्यंत आणि सहकारी पतसंस्‍थेपासून ते सहकारी बॅंकिंग क्षेत्राला बळकटी देण्‍याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. या सहकार परिषदेच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारने घेतलेल्‍या या ऐतिहासिक निर्णयबाद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याची संधी आपल्याला मिळाली असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले. प्रवरा परिसरात यापूर्वीही देशपातळीवरील असंख्‍य नेत्‍यांनी येऊन सहकार चळवळीच्‍या कार्याला दाद दिली आहे. अमित शाह यांच्‍या उपस्थितीत होणाऱ्या या राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेत सहकार चळवळीच्या पुढील प्रश्‍नांचा उहापोह होवून नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. वाचा: