भाजपच्या महिला आमदाराचे निधन, डेंग्यूने घेतला बळी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 13, 2021

भाजपच्या महिला आमदाराचे निधन, डेंग्यूने घेतला बळी

https://ift.tt/3pXy3Ls
अहमदाबाद : गुजरातमधील भाजप आमदार आशा पटेल यांचे रविवारी निधन झाले. त्यांना डेंग्यू झाला होता आणि त्यांच्यावर अहमदाबादमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आशा पटेल या महसाना जिल्ह्यातील ऊंझा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार होत्या. त्यांच्यावर जायडल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आणि त्या व्हेंटिलेटरवर होत्या. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ऊंझा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आशा पटेल यांचे निधन झाले आहे. हे सांगताना दुःख होतंय, असं नितीन पटेल म्हणाले. आशा पटेल यांना जायडस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डेंग्यू झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना वाचवता आलं नाही, असं नितीन पटेल यांनी सांगितलं. आशा पटेल यांचे पार्थिव ऊंझा येथे नेण्यात येईल. तिथे त्यांचे पार्थिव जनतेला अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यांना श्रद्धांजली वाहता येील. सिद्धपूर स्मशानभूमित त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा पटेल यांच्या शरारीतील अनेक अंग निकामी झाले होते, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी दिली. २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आमदार राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आशा पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आशा पटेल २०१७ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाल्या होत्या. त्यानंतर फेंब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत विजय मिळवत आपली जागा राखण्यात आशा पटेल यांना यश आलं होतं.