'... तर कुणी नादाला लागणार नाही'; महापौरांना आलेल्या 'त्या' पत्रावर शरद पवार बोलले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 12, 2021

'... तर कुणी नादाला लागणार नाही'; महापौरांना आलेल्या 'त्या' पत्रावर शरद पवार बोलले

https://ift.tt/33mb8BM
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (Kishori Pednekar) यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे कृत्य घडल्यानंतर सर्व मुलींनी एकत्र येऊन प्रतिक्रिया दिली पाहिजे, तर कोणी आपल्या नादाला लागणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली आहे. (NCP chief reacted to the threatening letter sent to ) या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार क्लिक करा आणि वाचा- '... तर कुणी नादाला लागणार नाही' सामाजिक कार्यात काम करत असताना महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. अश्लील भाषेचा वापर केला जातो याबाबत तुम्हाला काय वाटतं?, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, अशा प्रकारची उदाहरणे ऐकायला मिळत असतात. तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल मुंबईच्या महापौरांना अश्लाघ्य भाषेत पत्र लिहिण्यात आलं. त्या पत्रात टीकाटिप्पणी करण्यात आली आहे. त्यानंतर स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपलं सगळं म्हणणं मांडलं. ज्यांना अशा प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात त्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. त्याच्या संदर्भात आपली भूमिका तातडीने घ्यायला हवी. महापौरांना आलेल्या पत्रानंतर त्यांना यातना देणाऱ्यांच्या विरोधात जनमाणसातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. क्लिक करा आणि वाचा- आता इतरजण याबाबत खुलासा करत आहेत की आम्ही यात नाही. असे प्रकार होतात, ते प्रकार झाल्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, त्यावर रिअ‍ॅक्ट व्हाव लागेल. सर्व मुलींनी एकत्र येऊन रिअ‍ॅक्ट करण्याची भूमिका घेतली तर कुणी नादाला लागणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. महापौरांना आलेल्या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगत अश्लील भाषेत धमकी देणारे हे पत्र आहे. आपण महिला असतानाही हे पत्र आपण वाचू शकलो नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-