पंतप्रधान मोदींविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवारांची जीभ घसरली; म्हणाले, 'अकड तो मोदी की...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 13, 2021

पंतप्रधान मोदींविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवारांची जीभ घसरली; म्हणाले, 'अकड तो मोदी की...'

https://ift.tt/3pSG43X
चंद्रपूर : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले एसटी आंदोलन काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यावर सरकार आणि एसटी कर्मचारा दोघेही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या याच संपावर प्रतिक्रिया देताना माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरली असून त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. संपाविषयी विचारलं असता ते म्हणाले की" झूकेगा वही जिसमे जान है, अकड तो मोदी की खास पहचान है" असं राज्य सरकारने वागू नये, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. खरंतर, अप्रत्यक्षपणे मुनगंटीवारांनी पंतप्रधान मोदी यांच्या वागण्यावर टिका केली. अकड दाखवणं ही मोदींची खास ओळख आहे, त्यामुळे किमान राज्य सरकारने तरी असे वागू नये, असा सल्लाही मुनगंटीवारांनी दिला. मुनगंटीवारांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर पुढे मुनगंटीवार म्हणाले की " एसटीचा संप सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारने अहंकार सोडावा. एसटीचा कर्मचारी गरीब आहेत. एसटीसाठी त्यांनी अविरत कष्ट उपसले आहेत. त्यांचा कष्टाची सरकारने जाणीव ठेवावी आणि आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा" असंही ते यावेळी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देणार हे तुम्ही जाहिरनाम्यामध्ये लिहलं आहे. ते काय ड्रग्ज पार्टी करून लिहलं नाही. त्यावेळी तुम्ही पूर्ण शुद्धीत होतात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.