FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सीबीआय, आयकर आणि ईडी... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 13, 2021

FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सीबीआय, आयकर आणि ईडी...

https://ift.tt/3lW4Uiw
मुंबई/ नवी दिल्ली: शिवसेनेचे खासदार यांच्याविरोधात दिल्लीतील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात दिल्लीत दाखल केलेला एफआयआर हा राजकीय सूडभावनेतून आणि माझा आवाज दाबण्यासाठीच केला गेला आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्याविरोधात भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत भारद्वाज यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी एका मुलाखतीत कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरले होते. मंडावली पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर महिलांचा अवमान केल्याचा, तसेच अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दलच नाही, तर महिलांबद्दलही चुकीचे शब्द वापरले आहेत. या आधारे असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राऊत यांच्यासारख्या घटनात्मक पदावर विराजमान झालेले नेते, ज्यांची समाजाबद्दल जबाबदारी सामान्यांपेक्षा अधिक आहे, असे भारद्वाज यांनी सांगितले. देशातील महिला आणि भाजप महिला मोर्चा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, असेही त्यांनी सांगितले. दिल्लीत एफआयआर दाखल झाल्यानंतर राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात दिल्लीत दाखल झालेला एफआयआर हा राजकीय सूडभावनेतून आणि माझा आवाज दाबण्यासाठी केला आहे. ईडी, सीबीआय आणि आयकरचा वापर माझ्याविरोधात केला जाऊ शकत नाही, म्हणून माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठीच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मी खासदार आहे आणि माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यासाठी काही लोकांना उकसवण्याचे काम केले जात आहे, ते योग्य नाही, असे राऊत म्हणाले.