आता मंत्र्यांचा मोठा घोटाळा उघड करणार, महिनाभरात..; किरीट सोमय्यांचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 13, 2021

आता मंत्र्यांचा मोठा घोटाळा उघड करणार, महिनाभरात..; किरीट सोमय्यांचा दावा

https://ift.tt/3pNEyQR
डोंबिवली : नेते यांनी शिवसेनेवर पुन्हा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. करोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक रेकॉर्ड केला, असं ते म्हणाले. डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरकारमधील नेत्यांवर आरोप करत, आणखी काही मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार आहे, असेही ते म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या हे रविवारी डोंबिवलीत भाजप मेळाव्यात आले होते. यावेळी सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि नेत्यांवर सडकून टीका केली. मेळाव्यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, नितीन पाटील, मंदार हळबे आणि पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ''करोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केला आहे. मंत्र्यांचा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे. आता या मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि एक अधिकारी याच्या कंपनीला मुंबई महापालिकेत करोना काळात कशा पद्धतीने १०० कोटींचे कंत्राट मिळाले हे येत्या मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे. तर पुढच्या महिनाभरात आणखी पाच किस्से एमएमआर क्षेत्रातील महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील भागीदारी लोकांसमोर ठेवणार आहे.'' सोमय्या यांनी नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की 'चोरीचा माल परत केला म्हणून गुन्हा माफ होत नाही. गरज पडल्यास कोर्टात जाऊन त्यांनी चोरी केली होती हे सिद्ध करून त्यांना शिक्षा होईल हे पाहणार आहे.' मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्म दाखला शेअर केला होता. पण त्याबाबत कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाहीत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी महितीच्या अधिकारात दिल्याचे सोमय्यांनी सांगितले. त्यांना कुठून तरी झेरॉक्स मिळाली, ती त्यांनी दाखवली. महाराष्ट्रामधील जनतेमध्ये उत्सुकता आहे की समीर वानखेडेंचे जन्मदाखल्याचे गूढ मुंबईचे महापौर, नवाब मलिक आणि मुंबई पालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असे आवाहन सोमय्यांनी दिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत किरीट सोमय्यांना विचारणा केली असता, 'हे सरकार कोमात जातंय याची काळजी आहे. वीज गायब होते आहे, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अनिल परब रोज म्हणतात एसटी सुटली, एसटी गावाला निघाली. पण एसटी कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.