पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 10, 2021

पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील इंधन दर

https://ift.tt/3dzqt3M
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग ३६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर ८ रुपये कपात करण्यात आली होती. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. मुंबईत एक लीटर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर जवळपास २५ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी इंधनावरील व्हॅट कमी केला आहे. नुकताच राजस्थान आणि दिल्ली या राज्यांनी व्हॅट कमी केला होता. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा घातक विषाणू आढळून आल्यानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात गेल्या आठवड्याच कच्च्या तेलाचा भाव गडगडला होता. मात्र मागील दोन सत्रात तेलाच्या किमतीत सुधारणा झाली. ब्रेंट क्रूडचा भाव २२ सेंट्सने वधारला असून तो प्रती बॅरल ७६.०४ डाॅलर झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव ७२.६४ डाॅलर प्रती बॅरल असून त्यात २८ सेंट्सची वाढ झाली आहे.