
अहमदनगर: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील जाहीर सभेत ब्राह्मण व पुरोहितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Amol Mitkari) यांचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी ब्राम्हण समाजाच्यावतीने त्यांच्याविरूद्ध आक्रमक आंदोलन होत आहे. अहमदनगर शहरात राष्ट्रवादीचे यांनीही या आंदोलनात भाग घेत मिटकरी यांचा निषेध केला. ब्राम्हण समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत जगतापही पोलिस ठाण्यात गेले. तेथे मिटकरी आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. यातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव मात्र वगळण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. (it was the ncp mla who opposed ncp mla ) क्लिक करा आणि वाचा- अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळ व स्वातंत्र्यवीर सावरकर उत्सव समितीने मिटकरी आणि राष्टवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले. शहरातील पटवर्धन चौकात मिटकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मिटकरी, पाटील व मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मयूर जोशी, किशोर जोशी, अक्षय चिंधाडे, नरेंद्र खिस्ती, उपेंद्र खिस्ती, अमोल मोकाशी, प्रसाद पांडव, नीलेश धर्माधिकारी, सोमनाथ मुळे, सागर गोवर्धन, पराग दीक्षित, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मकरंद भट, आशुतोष रेखी, दिलीप मांडे उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून वारंवार ब्राह्मण समाजाची होत असलेल्या बदनामीच्या निषेधार्थ भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही निवडणुकीत समाज मतदान करणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यानंतर दुपारी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळास पाठिंबा देत उपस्थिती लावली. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिटकरी यांनी जे वक्त्व्य केले. त्याचा आम्ही निषेध करतो. आपले मत व्यक्त करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. ब्राम्हण समाज हा चांगल्या विचारांचा आहे. त्यांनी नेहमीच समाजाला चांगले विचार देण्याचे काम केले आहे. त्यांची अशी वेगळ्या भावनेने चेष्टा केली जाऊ नये. त्या विरोधात आम्ही आंदोलन करीत असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.’ क्लिक करा आणि वाचा- यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिटकरी यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर असून, गुन्हेगारी कृत्य या सदरात मोडते. अशा प्रकारचे वक्तव्य जाहीर सभेत करून मिटकरी यांनी गुन्हा केला आहे. या वक्तव्यास साथ देणारे जयंत पाटील व मंत्री धनंजय मुंडे यांनीही हा गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्याविरूदध कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यामध्ये मात्र जयंत पाटील यांच्या नाव वगळण्यात आले. पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांचे नाव वगळल्याचे सांगण्यात आले. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. क्लिक करा आणि वाचा-