लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे मोठे विधान; 'जुलमी औरंगजेबाने...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 22, 2022

लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे मोठे विधान; 'जुलमी औरंगजेबाने...'

https://ift.tt/IaeQRJF
नवी दिल्ली: ‘भारताकडून कुठल्याही देशाला अथवा समाजाला धोका पोहोचलेला नाही आणि आताच्या जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो,’ असे प्रतिपादन यांनी गुरुवारी केले. शीख गुरूंच्या आदर्श तत्त्वांचे पालन भारत करतो, असे ते म्हणाले. ( ) वाचा : शीख यांच्या ४००व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, ‘लाल किल्ल्याजवळील गुरुद्वारा गुरू तेग बहादूर यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी तेग बहादूर यांनी किती मोठा त्याग केला आहे, याची आठवण आपल्याला गुरुद्वारा करून देते. त्या काळात देशात धार्मिक कट्टरतावाद होता. भारतामध्ये धर्म म्हणजे एक तत्त्वज्ञान, विज्ञान मानले जायचे. धर्माच्या नावाखाली छळ, हिंसा करणाऱ्यांना भारत सामोरा जात होता. अशा वेळी गुरू तेगबहादूर यांच्या रूपात एक मोठी आशा भारताची ओळख टिकविण्यामध्ये होती. औरंगजेबासारख्या जुलमी विचारांपुढे गुरू तेगबहादूर अत्यंत खंबीरतेने उभे राहिले. आणि त्याच्यासारख्या जुलमी लोकांनी अनेकांना मारल्याचा लाल किल्ला साक्षीदार आहे; पण आपल्या संस्कृतीला ते आपल्यापासून वेगळे करू शकले नाही. गुरू तेगबहादूर यांच्यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे.’ वाचा : 'आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पुढे स्वातंत्र्याला शंभर वर्षे होतील तेव्हा एक नवा भारत आपल्याला दिसेल. म्हणून प्रत्येक क्षण देशहितासाठी खर्ची घालण्याची आवश्यकता आहे', असे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. 'भारताने कधीच कोणत्याही समाजाला दुखावले नाही. आज जागतिक संंघर्षाचा काळ असतानाही भारत जगाच्या कल्याणाचाच विचार सर्वप्रथम करत आहे. आम्ही ' ' हा संकल्प करतो तेव्हा त्यामागे व्यापक दृष्टीकोन आहे. आपल्यासोबत अवघ्याला जगाला प्रगतीचा मार्ग दिसावा, हा आमचा उद्देश आहे, असे नमूद करत नवा विचार, अपार कष्ट आणि शतप्रतिशत समर्पण भाव हीच शीख समाजाची खरी ओळख असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले. या वेळी पंतप्रधानांनी गुरू तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले. वाचा :