केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा आघाडी सरकारवर मोठा आरोप; म्हणाले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 25, 2022

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा आघाडी सरकारवर मोठा आरोप; म्हणाले...

https://ift.tt/Fu3Tt2R
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यातील (Law and Order) पुरती बिघडली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत आहे. यात पोलिसांना पुढे करुन महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष त्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतो की काय ? अशी चिंता राज्यातील जनतेला लागली आहे, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (Raosaheb Danve) यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. (union minister criticizes maha vikas over situation) क्लिक करा आणि वाचा- दानवे म्हणाले, 'सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले होत आहेत. आणि गुन्हे मात्र हल्ला झालेल्यांविरुद्ध दाखल होत आहेत. गेल्या एक महिन्याचा आढावा घेतला तर किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला झाला. हल्लेखोरांवर काहीच कारवाई झाली नाही. एरव्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन दोषींवर गुन्हे दाखल केले जातात. यावेळी मात्र तसेच काहीच होत नाही. अतुल भातखळकर यांच्या पोलखोल कार्यक्रमावर हल्ले झाले, दगडफेक झाली. राज्यात अन्यठिकाणीही भाजप आमदारांना असेच अनुभव आले. हल्लेखोरांविरुद्ध काहीच कारवाई झाली नाही.' क्लिक करा आणि वाचा- 'आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार होते. त्यांनी घरासमोर जाऊन पठण करावे या मताचा मी नाही, मात्र सरकारचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलले असते तर कदाचित त्यातून मार्ग निघाला असता. उलट त्यांना कैद केले गेले. त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला. राज्यात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राणा यांच्या घराजवळ जमलेल्या शिवसैनिकांवर मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत. या वागणुकीत जगात प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र पोलिस बदनाम होण्याची भीती आहे. विरोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नाही तरी ते सभा घेतील,' असा दावा दानवे यांनी केला. क्लिक करा आणि वाचा-