ग्लोबल चेंज मेकर; महाराष्ट्रातील विनायक हेगाणा याची जागतिक पातळीवर दखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 27, 2022

ग्लोबल चेंज मेकर; महाराष्ट्रातील विनायक हेगाणा याची जागतिक पातळीवर दखल

https://ift.tt/tS9rudc
उस्मानाबाद : शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड गावच्या एका तरुणाचा जागतिक पातळीवर गौरव झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विनायक हेगाणा (Vinayak Hegana) असे या युवकाचे नाव असून त्याच्या कार्याची दखल घेत त्याला संयुक्त राष्ट्रसंघाची () ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप देऊन गौरविण्यात आले आहे. ज्या तरुणांच्या कामाचा सकारात्मक प्रभाव समाजावर पडलेला आहे अशा जगातील १८ देशांमधून आलेल्या ३२ युवकांची या उपक्रमात निवड करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने () ठरविलेल्या १२ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ()अंतर्गत या युवकांच्या कामाचा विचार केला गेला आहे. अशा युवकांना ग्लोबल चेन्जमेकर फेलोशिप देवून गौरविण्यात येते. ( was selected as the global change maker from 18 countries) उस्मानाबादला आपली कर्मभूमी म्हणून स्वीकारलेल्या विनायक हेगाणा या युवकाच्या कामाची नोंद घेऊन त्याची ग्लोबल चेंजमेकर म्हणून निवड करण्यात आली आहे. विनायक मागील ७ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात अविरतपणे काम करीत आहे. शिवार संसद युवा चळवळ उभी करून ३ हजार शेतकरी कुटुंबातील युवकांची स्वयंसेवक म्हणून त्याने फौज उभी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- आत्महत्या होऊच नये यासाठी 'शिवार हेल्पलाईन' या संशोधनपर संकल्पनेतून आतापर्यंत १९५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास यश आले आहे. या समाजोपयोगी कामाची राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यापीठ स्तरावर, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स, मुंबई, आय.आय.टी मुंबई व नीती आयोग भारत सरकार मार्फत ही दखल घेण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- यापुढे जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनासाठी ३ वर्षांच्या संशोधनातून उस्मानाबाद शेळीच्या दुधापासून साबण निर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात सुरूही करण्यात आली आहे. यातून २५० पेक्षा जास्त कुटुंबांना मदत होत आहे. याची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या(UNDP) अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल (SDG) category मध्ये Top 25 Social innovation मध्ये जानेवारी २०२० निवड करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- मूळचा कोल्हापूरचा मात्र उस्मानाबाद जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानून विनायक हेगाणा उपलब्ध साधनांमध्ये येथील गरजू शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्याच्या या गौरवानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.