टेक्सास गोळीबारात १९ मुलांचा मृत्यू, निवेदकाला ऑन एअर अश्रू अनावर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 27, 2022

टेक्सास गोळीबारात १९ मुलांचा मृत्यू, निवेदकाला ऑन एअर अश्रू अनावर

https://ift.tt/cMevwTr
वॉशिंग्टन : अमेरिकन दूरचित्रवाहिनी निवेदक आणि विनोदी कलाकार जिम्मी किम्मेल याला टेक्सासमधील घटनेसंदर्भात भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. जिम्मी किमेल लाइव्ह या कार्यक्रमात टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात १९ मुलांच्या आणि दोघांच्या मृत्यूबद्दल टेक्सासमधील प्रशासनानं विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं. जिम्मी किमेल यानं त्याच्या कार्यक्रमाची सुरुवात टेक्सास गोळीबाराच्या विषयानं केली. मंगळवारी कार्यक्रम रेकॉर्ड झालेला असताना त्यानं लाइव्ह करुन भावना मांडल्या. टेक्सासमधील उवाल्दे येथील रॉब इलेमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबाराचा मुद्दा मांडताना किमेल भावूक झाला होता. जिम्मी किमेल यानं स्टुडिओतून थेट प्रेक्षकांशिवाय कार्यक्रमाचं निवेदन केलं. यावेळी किमेल याच्या संबोधनात जीव गमावलेल्या निष्पाप मुलांबद्दल सद्भावना दिसून आली. त्याचवेळी या घटनेला जबाबदार असलेल्या व्यवस्थेविषयी राग दिसून आला. जिम्मी किमेल हा कार्यक्रम सादर करताना भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. त्यावेळी तो ज्या लहान मुलांनी, मुलींनी आणि व्यक्तींनी जीव गमावला त्यांच्याबद्दल बोलत होता. गोळीबारात त्या १९ मुलांचं आणि २ व्यक्तींचं कुटुंब उद्धवस्त झाल्याची भावना त्यानं व्यक्त केली. किमेल यानं बहुतांश अमेरिकन नागरिक लहान मुलांच्या आणि गुन्हेगारांपासून बंदुकीपासू दूर ठेवण्याच्या बाजूनं असल्याचं म्हटलं. बंदुकीच्या वापरासंदर्भातील कायद्याला पाठिंबा देण्याची गरज असल्याचं किमेल यानं म्हटलं. जिम्मी किमेल यानं टेक्सासमधील सरकारला आणि प्रशासनाला ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणं पावलं उचलण्याचं आवाहन केलं. त्या दोन्ही देशांमध्ये गोळीबाराच्या घटना नियंत्रणात आणल्या गेल्याचं त्यानं सांगितलं. आपण ठरवलं आणि याबदद्ल विचार केला असता आपण तसं करु शकतो, असं तो म्हणाला. जिम्मी किमेल यांच्या कार्यक्रमाचं मंगळवारी चित्रीकरण करण्यात आलं होतं. मात्र, टेक्सासमधील शाळेत घडलेल्या गोळीबारामुळं त्यांनी लाइव्ह टेलिकास्ट केलं. टेक्सासमधील १९ मुलांवर आणि २ व्यक्तींवर करण्यात आलेल्या गोळीबाराची तुलना १० वर्षापूर्वीच्या सँडी हूक हत्याकांडाशी केली जात आहे. अमेरिकेत गेल्या महिन्यात देखील एका व्यक्तीनं सुपरमार्केटमध्ये जाऊन गोळीबार केला होता. टेक्सास गोळीबाराच्या घटनेवर राष्ट्रपती जो बायडन यांनी देखील भूमिका मांडली आहे.