शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 12, 2022

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

https://ift.tt/gRpBZw9
मुंबई: शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार () यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे झाल्याचे वृत्त आहे. ते ५२ वर्षांचे होते. दुबईत त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना लटके यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. (shiv sena mla from andheri east passes away due to heart attack) लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले. क्लिक करा आणि वाचा- भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे २०१४ मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. पुढे २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे १६ हजार ९६५ मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे जगदीश अमीन हे तिसऱ्या स्थानी होते. क्लिक करा आणि वाचा- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असलेले रमेश लटके यांनी आपल्या विभागातील लोकांवर छाप पाडायला सुरुवात केली. त्यांची लोकप्रियता पाहून शिवसेनेने त्यांना नगरसेवकपदासाठीची उमेदवारी दिली. ते १९९७ साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. क्लिक करा आणि वाचा-