धक्कादायक! मैत्रिणीला घेऊन जंगलात जाणे जीवावर बेतले; युवकावर वाघाचा हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 4, 2022

धक्कादायक! मैत्रिणीला घेऊन जंगलात जाणे जीवावर बेतले; युवकावर वाघाचा हल्ला

https://ift.tt/IiCqXYR
गडचिरोली: जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातल्या परिसरात एका नरभक्षक वाघाने युवकावर हल्ला करून ठार मारल्याची दुर्दैवी घटना ०३ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अजित सोमेश्‍वर नाकाडे (वय २१ वर्ष, रा. कोरेगाव ता. देसाईगंज) असे आहे. (a youth who went for a walk in the forest with his girlfriend died in a tiger attack in ) क्लिक करा आणि वाचा- मृतक युवक आपल्या मैत्रीणीसोबत दुचाकीने उसेगाव जंगल परिसरात फिरायला गेला होता. हे दोघे जगलाच्या आतील भागात पोहोचले. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर अचानक हल्ला केला. त्यानंतर वाघाने या युवकाला जंगलात फरफटत नेले. ही माहिती मृतक युवकासोबत असलेल्या मुलीने लोकांना दिली. क्लिक करा आणि वाचा- जवळपास दोन तासापर्यंत शोध मोहीम राबविल्यानंतर युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच, वनविभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वडसा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती देसाईगंजचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी दिलेली आहे. पुढील तपास वन विभाग आणि देसाईगंज पोलीस विभाग करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-