आषाढी वारी; एसटीच्या पुणे विभागाची जोरदार तयारी, पंढरपूरसाठी ५३० बस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 14, 2022

आषाढी वारी; एसटीच्या पुणे विभागाची जोरदार तयारी, पंढरपूरसाठी ५३० बस

https://ift.tt/CnLP3yb
म. टा. प्रतिनिधी, पुणे आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाने जोरदार तयारी केली आहे. यंदा प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून ५३० गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहे. (the pune division of st has made strong preparations ashadhi wari) करोनामुळे गेली दोन वर्ष पंढरपूरची वारी झालेली नाही. या वर्षी आषाढी वारी होणार असल्यामुळे पंढरपूर येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातून देखील पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. त्यात दोन वर्षानंतर ही वारी होणार असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाने तयारी केली आहे. या वर्षी जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. क्लिक करा आणि वाचा- त्यानुसार यंदा ५३० गाड्या पंढरपूरसाठी पुणे विभागातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकर्‍यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षातील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- गावातून एसटीची सोय एकाच गावातील वारकऱ्यांनी समुहाने एसटीचे बुकींग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली आहे. ४० जणांच्या समूहाने एकत्र बुकींग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधी एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासने केले आहे. क्लिक करा आणि वाचा-