
: पर्यटक असल्याची बतावणी करून आलेल्या तिघांनी शनिवारी रत्नागिरी शहरातील दोन रिक्षाचालकाना गुंगीचे औषध देऊन लुटल्याच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका घटनेत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. हा रिक्षा चालक पटवणे - साई मंदिर येथे बेशुद्धावस्थेत सापडला. दुसऱ्या घटनेत विनेश मधुकर चौगुले यांच्या बाबत चर्मालय येथे घडली आहे. गुंगीचे औषध देऊन दोघांनाही बेशुद्ध करण्यात आले व त्यांच्याकडील ऐवज घेऊन संशयित पसार झाले. या दोन्ही रिक्षा चालकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात संशयितांविरुद्ध जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. ११) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुढे आली आहे. (Unidentified persons robbed two drivers claiming to be tourists in Ratnagiri) मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक आशीष संजय किडये (वय २९, रा. धनजी नाका रत्नागिरी) हा स्वतःची रिक्षा घेऊन सकाळी आठच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे कोल्हापूर येथील तीन पर्यटकांना घेऊन गेला होता. दुपार पर्यंत तो परत आला नाही. त्याचे वडील त्याला फोन करत होते. पण तो फोन उचलत नव्हता. दुपारी आशीषला मारहाण व गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेत रिक्षासह पटवणे येथे आणून सोडल्याचे समजले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्याकडील एक तोळ्याची सोन्याची चैन, हातातील दोन अंगठ्या, मोबाईल एटीएमकार्ड गायब झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- गणपतीपुळेहून येताना संशयित तीन पर्यटकांनी त्याला गुंगीचे औषध वापरून भंडारपुळ्यादरम्यान प्रसाद खाण्यास दिला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याला मारहाण करण्यात आली असून त्याच्या पायावर मारहाणीच्या खुणा दिसून येत आहेत. आशीष अद्यापही शुद्धीत आलेला नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा- अशीच दुसरी एक घटना चर्मालय येथे घडली. येथे विनेश मधुकर चौगुले याला गुंगीचे औषध देऊन दोघांनाही बेशुद्ध करण्यात आले व त्यांच्याकडील ऐवज घेऊन संशयित पसार झाले. क्लिक करा आणि वाचा-