'तो' बदली ड्रायव्हर म्हणून गेला आणि परतलाच नाही; दोन चिमुकली वडिलांच्या मायेला मुकली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 8, 2022

'तो' बदली ड्रायव्हर म्हणून गेला आणि परतलाच नाही; दोन चिमुकली वडिलांच्या मायेला मुकली

https://ift.tt/1L29e3z
रत्नागिरी : कोकणात मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघाताने आजवर शेकडो नव्हे तर हजारो जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दोन दिवसांपूर्वी येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात बदली ड्रायव्हर म्हणून गेलेला ट्रक घेऊन गेला तो पुन्हा आलाच नाही. या घटनेने लांजा तालुक्यातील पुनस परिसरावर शोककळा पसरली आहे. ( of sawantwadi lost life in severe accident in ) विजय मुंबईतून चुलत भावाच्या लग्नासाठी गावी आला होता. विजेश सावंत हा गावातील मनोहर कडू यांच्या मालकीच्या ट्रकवर बदली ड्रायव्हर म्हणून गेला. तो घरी परतलाच नाही. त्याच्या अकाली जाण्याने दोन्ही मुले वडिलांच्या मायेला मुकली आहेत. क्लिक करा आणि वाचा- पुनस गावातील सावंतवाडीमधील रहिवासी असलेला विजेश सावंत हा आपली पत्नी, आई आणि दोन लहान मुले असे त्याचे कुटुंब आहे. लहान मुलगा बालवाडीत तर मुलगी दुसरीत शिकत आहे. विजेश सावंत हा उत्तम ड्रायव्हर होता. त्याला तब्बल पंधरा वर्षांचा गाडी चालवण्याचा अनुभव होता. अलीकडेच नोकरीनिमित्त तो मुंबईला गेला होता. चुलत भावाचे लग्न असल्याने तो महिनाभरापूर्वी गावी आला होता. गावातीलच मनोहर कडू यांना गुजरात येथून शाडुमाती आणण्याचे भाडे आले होते. मात्र त्यांच्या ड्रायव्हरने आपल्याला विश्रांती हवी आहे असे सांगितले होते. त्यामुळे मनोहर कडू यांनी विजेश यास तू गुजरातला गाडी घेऊन जाशील का असे विचारले. त्यामुळे विजेश सावंत देखील त्याला तयार झाला आणि तो ट्रक घेऊन गेला होता. गुजरात येथून गणपतीची शाडू माती घेऊन रविवारी लांजाकडे येत असतानाच आंजणारी येथे ब्रेकफेल झाले आणि घात झाला. क्लिक करा आणि वाचा- विजेशच्या दुर्देवी मृत्यूमुळे सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सोमवारी ६ जून रोजी सकाळी सात वाजता विजेश सावंत यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विजेश सावंत याच्यावर पूनस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुनस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. क्लिक करा आणि वाचा-