बाईकचे पेपर दाखव! निरीक्षकानं पावती फाडली; लाईनमननं पोलीस ठाण्याची वीज कापली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 13, 2022

बाईकचे पेपर दाखव! निरीक्षकानं पावती फाडली; लाईनमननं पोलीस ठाण्याची वीज कापली

https://ift.tt/lHSU8zW
बरेली: उत्तर प्रदेशमध्ये बरेलीत एक अजब प्रकार घडला आहे. वीज विभागात लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या एकावर पोलीस निरीक्षकानं कारवाई केली. त्याला दंड ठोठावला. त्यामुळे रागावलेल्या लाईनमननं पोलीस चौकीचा केला. विजेची वायर कापून लाईनमन ती स्वत:सोबत घेऊन गेला. पोलीस चौकी अंधारात जाताच प्रभारींनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. यानंतर वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. वीज नसल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. सध्या या घटनेची पंचक्रोशीत चर्चा आहे. हरदासपूर पोलीस चौकीत हा प्रकार घडला. या चौकीचे प्रभारी वाहनांची तपासणी करत होते. या दरम्यान बरसेर सब स्टेशनचे लाईनमन भगवान स्वरुप उर्फ पिंकी दुचाकीनं तिथून जात होते. पोलीस निरीक्षक मोदी सिंह यांनी लाईनमनला अडवले. सध्या माझ्याकडे दुचाकीचे कागद नाहीत. घरून आणून दाखवेन, असं भगवान स्वरुप यांनी सांगितलं. मात्र मोदी सिंह यांनी ऐकलं नाही. त्यांनी ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे भगवान स्वरुप नाराज झाले. त्यांनी वीज विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि पोलीस चौकीचा वीज पुरवठा खंडित केला. पोलीस कर्मचारी लाईनमनला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही त्यानं विजेचं कनेक्शन पूर्ववत केलं नाही. हरदासपूर पोलीस चौकीत मीटरशिवाय विजेचा वापर केला जात असल्याचं स्वरुप यांनी सांगितलं. मीटरशिवाय विज वापरली जात असल्यानं लाईन कापण्यात आल्याची आणि तार कापल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं वीज विभागाचे मुख्य अभियंता असलेल्या संजय जैन म्हणाले. चौकशी अहवाल आल्यानं पुढील कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.