‘त्या’ अपक्ष आमदारांचं आघाडीलाच मतदान, राष्ट्रवादीच्या आमदाराची स्पष्टोक्ती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 13, 2022

‘त्या’ अपक्ष आमदारांचं आघाडीलाच मतदान, राष्ट्रवादीच्या आमदाराची स्पष्टोक्ती

https://ift.tt/hqOVmeT
जळगाव : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते खासदार यांनी अपक्ष आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप केल्यानतंर महाविकास आघाडीत धुसफुस निर्माण झाली. दरम्यान, संजय राऊतांच्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटल यांनी उत्तर दिले आहे. आमदार देवेंद्र भुसार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंगेंनी महाविकास आघाडीलाच मतदान केल्याची खात्री मतदानावेळी केली असल्याचे, आमदार पाटील यांनी सांगीतले आहे. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी आमच्या मित्र पक्षांनीच दगाबाजी केल्याचा आरोप करत काही अपक्ष आमदारांची नावेही घेतली होती. राज्यसभा निवडणुकीत ज्या लोकांनी आम्हा शब्द दिला तो शब्द पाळला गेला नाही. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय शिंदे, नांदेडचे आणि या आमदारांची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. अमळनेर येथिल आमदार व राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंगे या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे. या निवडणुकीत आमचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा काउंटिंग एजंट होतो, माझ्यासह सुनील तटकरे आणि संजय खोडके यांच्यावर, या तीनही आमदारांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं आहे किंवा नाही, याची खात्री केली आहे. त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी संशोधन केले पाहिचे, असा टोलाही आमदार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. देवेंद्र भुयार शरद पवार आणि संजय राऊत यांच्या भेटीला मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत यांनी काल केलेले आरोप फेटाळले होते. देवेंद्र भुयार आज तातडीनं मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला रवाना झाले. संजय राऊत यांची भेट घेऊन देवेंद्र भुयार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.