
पुणे : पंजाबी गायक याच्या हत्येप्रकरणी सौरव महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. आळेफाटा परिसरातील आळे खिंड या भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची दिल्ली आणि मुंबई येथील पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता पंजाब पोलिसांकडूनही त्याची चौकशी आता सुरू झाली आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (punjab police has started investigation into sidhu moose walas case in ) सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज सकाळी पंजाब पोलिसांचे पथक पुणे ग्रामीण मुख्यालयात दाखल झाले होते. त्यांनी याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेऊन पंजाब पोलीस नुकतेच पंजाबला रवाना झाले आहेत. सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आहे का? या संदर्भातील तपास पंजाब पोलिसांकडून केला जात आहे. क्लिक करा आणि वाचा- ग्रामीण पोलीसांच्या अटकेनंतर सौरभ महाकालने सलीम आणि सलमान खान त्यांच्या धमकी पत्राबाबतच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यानंतर मुसेवाला प्रकरणाबाबत पंजाब पोलिसही आज पुण्यात दाखल झाले होते.मुसेवाला प्रकरणाची चौकशी महाकाल याच्याकडून केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यात अनेक घटनांचा उलगडा होतो का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा- सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित सौरभ महाकाल याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९ जून रोजी चौकशी केली. या प्रकरणी मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर महाकाल फरार होता. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी पुण्यात चौकशीसाठी दाखल झाले. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाल हे संशयित आरोपी आहेत. क्लिक करा आणि वाचा- दिल्लीतील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीने मुसेवालाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले असून याच बिष्णोई टोळीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.