आम्हाला कोणीही सोबत राहू देणार नाही! चिठ्ठी लिहून प्रेमी युगुलाची ट्रेनसमोर उडी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 19, 2022

आम्हाला कोणीही सोबत राहू देणार नाही! चिठ्ठी लिहून प्रेमी युगुलाची ट्रेनसमोर उडी

https://ift.tt/xE2RhZI
बाडमेर: राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एका प्रेमी युगुलानं ट्रेनसमोर उडी घेत केली. सिवाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. प्रेमी युगुलाच्या आत्महत्येची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ माजली. पोलिसांना मृतदेहांजवळ एक चिठ्ठी सापडली. आपण आपल्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यात आहे. १६ वर्षांचे मुलीचे २२ वर्षांच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सध्या सिवाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आम्ही आमच्या मर्जीनं आत्महत्या करत आहोत. यात कोणाचाही दोष नाही. त्यामुळे कोणालाच काही बोलू नका आणि बदनामही करू नका. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि आम्हाला कोणी सोबत राहू देणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या इच्छेनं आत्महत्या करत आहोत, अशी चिठ्ठी लिहून दोघांनी जीवन संपवलं. रेल्वे पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर मोकलपूर पोलीस ठाण्याचे एसआय जयकिशन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते सिवाना रुग्णालयात पाठवले. दोघांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.