'शिवसेना फोडण्यासाठी कोकणात सुपारी, पैशाचे आमिष दाखवले जाते'; शिवसेना जिल्हाप्रमुखाचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 24, 2022

'शिवसेना फोडण्यासाठी कोकणात सुपारी, पैशाचे आमिष दाखवले जाते'; शिवसेना जिल्हाप्रमुखाचा आरोप

https://ift.tt/DpQntLK
म. टा. प्रतिनिधी, () यांचे कोकणातील समर्थक नेते आणि प्रमुख पदाधिकारी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Shiv Sena) फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप होत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन दिवसांत, १७ पदाधिकाऱ्यांना पद आणि पैशाचे आमिष दाखविल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न, निष्ठावंत शिवसैनिक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही त्यांनी हा आरोप करताना स्पष्ट केले आहे. (the samparkh pramukh has accused the shinde group) कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना पवार यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेत फूट पाडण्याची जबाबदारी, कोकणातील काही नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना फोडणाऱ्यांना आणि शिवसेनेतून फुटून बाहेर पडणाऱ्यांना योग्य वेळी शिवसेना स्टाईलनं धडा शिकवला जाईल. क्लिक करा आणि वाचा- ते म्हणाले, राधानगरी तालुक्यातील आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंड केले. पण त्यांच्याच तालुक्यातील पंचवीस हजार कार्यकर्त्यांची शिवसैनिक म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. याशिवाय २७ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात एक लाख कार्यकर्त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या दारात केक कापण्याबरोबरच कोल्हापुरात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. क्लिक करा आणि वाचा- जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी, १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी सर्व आमदार अपात्र ठरतील, या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच ते शिवसेनेतील पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी विजय देवणे, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, रविकिरण इंगवले उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा-