बंडखोर आमदारांबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, 'ते सभागृहात आल्यानंतर...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 3, 2022

बंडखोर आमदारांबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, 'ते सभागृहात आल्यानंतर...'

https://ift.tt/z1CxtHM
पुणे: राज्यात महविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० आमदरासह भाजप बरोबर सरकार स्थापन केली . उद्या दोन दिवसीय अधिवेशन असून गोवा येथे असलेले बंड आमदार हे मुंबईत येणार असून विधानसभेत उद्या काय चित्र होईल यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आपल मत व्यक्त केले आहे. has said that after the of shiv sena enter the house their opinion will change पवार म्हणाले की, सभागृहात गेल्यानंतर हे सगळे विचारवंत काय करणार आहे. त्याच्यावर अवलंबून आहे. पण अस बोलल जात आहे की जे गेले ते परत आल्यानंतर सभागृहात बसल्यानंतर त्यांचा मतपरिवर्तन झालेला बघायला मिळेल. असा विश्वास काही लोकांना आहे. मला असा विश्वास नाही. असं यावेळी पवार म्हणाले क्लिक करा आणि वाचा- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माझे त्या बंडखोर आमदारांशी तसा काहीच कॉन्टॅक्ट नाही. माझा संबंध हा सेनेच्या नेत्यांशी असेल, आमदारांशी नाही. त्यामुळे ते आमदार उद्या नक्की काय करणार हे माहीत नाही. अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होणार हे पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, आत्ता तर झिरवळ हे आहेत. पण सभागृहाने काही निर्णय घेतला तर तो निर्णय अंतिम आहे. कोर्टात त्यांच्या विरोधात जर याचिका असेल तर याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांचे पद गेलेले आहे. आज रोजी कायद्याने त्यांना अधिकार आहे की नाही हे महत्वाचे आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले. क्लिक करा आणि वाचा येणाऱ्या काळात राज्यात पुन्हा महविकास आघाडी सरकार दिसेल का अस पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, अशी काहीच चर्चा आमच्यात झालेली नाही. उद्या विधानसभेत जे काही होईल त्याबाबत आमचे नेते आज बसून निर्णय घेतली. उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करावेच लागेल, असे देखील यावेळी पवार म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- कोणत्याही राज्यपालाने माझ्या तोंडात पेढा भरवला नाही- पवार राज्यपाल यांच्याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या पण कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात कधी पेढा भरवला नाही, कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही. तसेच मागील शपथ विधी वेळी अनेकांनी सुरुवातीला स्मरण करून नाव घेतली.त्यांना पुन्हा शपथ घेण्यास लावली.पण यावेळी काय झाल आपण सर्वांनी पाहिले आहेच.असा टोला देखील यावेळी पवार यांनी लगावला.