स्मशानभूमी पाण्याखाली; अखेर रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची आली वेळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 18, 2022

स्मशानभूमी पाण्याखाली; अखेर रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची आली वेळ

https://ift.tt/XRZdDGc
: कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीचे पाणी वाढत असल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली जात आहे. इतकेच नाही तर नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमींना देखील याचा फटका बसत आहे. शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावच्या स्मशानभूमीचीही हीच अवस्था आहे. या परिसरात पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. येथील स्मशानभूमीच पाण्याखाली गेल्यामुळे अखेर ग्रामस्थांना रस्त्यावरच अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पुराचा फटका बसणाऱ्या स्मशानभूमीचा अभ्यास करून योग्य ठिकाणी नव्या स्मशानभूमी उभाराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. (Cremation had to be done by the roadside as the cemetery was submerged) रस्त्याच्या बाजूला करण्याची वेळ गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. सन २००५, २०१९ आणि २०२१ असे तीन वर्षे महापुराचे पाणी कोल्हापूर शहरात आल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. पुराच्या पाण्यामुळे शहरातील स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेल्या होत्या. यामुळे मुसळाधार पावसाच्या दिवसांत एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न बिकट बनतो. अशी स्थिती कोल्हापूरकरांनी वारंवार अनुभवली आहे. क्लिक करा आणि वाचा- यावर्षी देखील कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती होत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आणि नदीचे पाणी स्मशानभूमीत शिरले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील शिरदवाडच्या नागरिकांना अंतिमसंस्कार रस्त्याच्या कडेला करण्याची वेळ ओढवली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरवर्षी पाणीपातळीत वाढ झाली की जातेच. यामुळे आमच्यावर रस्त्याचा कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. म्हणून शासनाने जिथे जिथे स्मशानभूमी पाण्याखाली जाते, तिथे तिथे पर्यायी स्मशानभूमी उभाराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-