नागपुरात खळबळ! पोलिस अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुंगीचे औषध देत दारू पाजली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 18, 2022

नागपुरात खळबळ! पोलिस अधिकाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुंगीचे औषध देत दारू पाजली

https://ift.tt/T4L5njC
: पोलिस अधिकाऱ्याने चिखलदऱ्यातील लॉजमध्ये नेऊन नागपुरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. अत्याचारापूर्वी त्याने मुलीला गुंगीचे औषध देऊन दारूही पाजली. मुलीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अत्याचार, पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून उपनिरीक्षकाला अटक केली. प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (वय ३५, रा. फ्रेण्डस कॉलनी, गिट्टीखदान), असे अटकेतील अधिकाऱ्याचे असून, तो नक्षल विरोधी अभियानात (एएनओ) उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. या घटनेने एएनओमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नागपुरातील महाविद्यालयात बारावीत शिकते. तो तिचा काळजीवाहक आहे. १३ जुलैला फिरायला जाण्याच्या बहाण्याने कारने तो मुलीला चिखलदरा येथे घेऊन गेला. लॉजमध्ये नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. दारूही पाजली. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. क्लिक करा आणि वाचा- अत्याचारानंतर काही वेळाने मुलगी शुद्धीवर आली. त्यानंतर तिने त्याला जाब विचारला. याबाबत कोणाला सांगितल्यास प्रदीपकुमारने तिला ठार मारण्याची धमकी दिली. धमकीनंतर प्रदीपकुमारने पीडिच मुलीला नागपुरातील घरी सोडले. मुलीने आई-वडिलाला प्रदीपकुमारने अत्याचार केल्याची माहिती दिली. क्लिक करा आणि वाचा- या घटनेबाबत कळताच पीडित मुलीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, लागलीच तिचे आई-वडील नागपुरात आले. मुलीला घेऊन सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रदीपकुमारला अटक केली. क्लिक करा आणि वाचा-