सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला! दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदाची जीवघेणी स्टंटबाजी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 20, 2022

सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला! दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदाची जीवघेणी स्टंटबाजी

https://ift.tt/MVJlhZC
जळगाव : जळगाव शहरातील सागर पार्कवर दही हंडी सोहळ्यादरम्यान एक तरुण थेट लटकविलेल्या क्रेन मशीनवर चढून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सूत्र संचालकांनी विनंती गेल्यावर हा तरुण खाली उतरला. दही हंडी फोडण्यासाठी आलेल्या एका पथकातील हा असल्याची माहिती समोर आली आहे. (Govinda, who came to to break Dahi Handi, performed life-threatening stunts) सागर पार्क मैदानावर फाउंडेशन च्या वतीने सालाबजाप्रमाणे यावर्षीही कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती होती. या ठिकाणी तरुणांचा प्रचंड जल्लोष व उत्साह पाहायला मिळाला. येथे ढोल ताशांचे पथक आणि डीजेमधील गाण्यावर तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळाले. क्लिक करा आणि वाचा- आज दहीहंडीचा उत्सव असल्याने सगळीकडे अनोखा उत्साह आणि जल्लोष सुरू होता. या दरम्यान दहीहंडी फोडण्यासाठी आलेला गोविंदा पथकातील एक तरुण अचानक दहीहंडी लटकावलेल्या क्रेन मशीनवर चढला. ते दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. यावेळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणी आयोजकांकडून तरुणाला खाली उतरण्याची विनंती करण्यात आली. तब्बल ६० फुटांची ही दहीहंडी होती. हा गोविंदा ३० ते ४० फुटावर चढला. यावेळी प्रचंड जल्लोष सुरू असताना शुकशुकाट झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वांचे लक्ष तरुणाकडे होते. सर्व जण थक्क झाले होते. थोड्या वेळाने हा तरुण खाली उतरला. क्लिक करा आणि वाचा- हा तरुण दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या पथकातील गोविंदा असल्याची माहिती समोर आली आहे. तो क्रेन मशीन वरून खाली उतरल्यानंतर आयोजकांसह उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. क्लिक करा आणि वाचा-