अतिवृष्टीनं मारलं, शिंदे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महिला शेतकरी सरसावल्या, काळ्या फिती बांधून राबल्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 21, 2022

अतिवृष्टीनं मारलं, शिंदे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महिला शेतकरी सरसावल्या, काळ्या फिती बांधून राबल्या

https://ift.tt/sdZQFGp
धुळे : अतिवृष्टीमुळं शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकासन होऊन देखील राज्य सरकार तसेच स्थानक प्रशासनाकडून वेळेत मदत मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात संतप्त झाला आहे. साक्री येथील महिला शेतक-यांनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळपासूनच डोक्याला काळी फिती बांधून शेतात काम केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि तातडीनं कार्यवाही करावी, यासाठी शेतकरी महिलांनी काळी फित बांधून प्रतिकात्मक आंदोलन केलं. यंदा राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे त्यातच अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. असून अद्यापही नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर कुठलाही अधिकारी पोहोचला नसून राज्य सरकारतर्फे देखील अद्याप कुठलीही दखल घेतली नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळं मोठ्या प्रमाणात नाराजी बघायला मिळत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की काय..? असा प्रश्न आणि चर्चा आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरु झाल्या आहेत. राज्यात सुरू असलेली पावसामुळे सर्वत्र निर्माण झालेली जलमय परिस्थितीने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासन किंवा राज्य सरकार धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असून अद्याप पर्यंत साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई साठी पंचनामे देखील करण्यात आले नसल्याचा आरोप कृषी कन्या प्रियांका जोशी यांनी केला आहे. सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्य सरकारचे या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी साक्री येथील कृषी कन्या असलेल्या प्रियांका जोशी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी महिलांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शेतीत दिवसभर काम करून अनोख्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध नोंदविला आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी आता या शेतक-यांनी केली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेतकरी महिलांच्या प्रतिकात्मक आंदोलनाची कशी दखल घेतात हे पाहावं लागणार आहे.