ताम्हिणी घाटात भीषण अपघात, विदर्भातील तीन जण ठार, चार जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 21, 2022

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, विदर्भातील तीन जण ठार, चार जखमी

https://ift.tt/fdHaLWF
प्रसाद रानडे, रायगड/माणगाव : कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा जिल्हयाच्या हद्दीजवळ असलेल्या ताम्हिणी घाटात शनिवारी सायंकाळी मोठा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. महाड जवळ मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगावपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर थेट कोकण-पुणेला जोडणाऱ्या रस्त्यावरील ताम्हिणी घाटात स्विफ्ट डिझायर कारला भीष्ण अपघात झाला. ही कार सुमारे २०० फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. सदरचा अपघात शनिवार २० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला. वाशिम आणि अकोला येथील आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकूण ६ प्रवासी होते. ते कोकणात पर्यटनासाठी आले होते. वाशिमला हून तळ कोकणात असलेल्या देवगडाला हे पर्यटक जात होते. यावेळी हा दुर्दैवी भीषण अपघातात झाला. त्यांची गाडी ताम्हिणी घाटात आली असता एक वळणावर कार कठड्यावरुन सुमारे दोनशे फूट फेकली गेली. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांसह साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त कारमध्ये मृत झालेले ३ प्रवासी व जखमी चार प्रवासी अडकून पडले होते. त्यांना पोलिसांनी, साळुंखे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. मृत व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण व अन्य एक प्रवासी जखमी आहे त्याचे नाव समजू शकलेले नाही. चारहीजण गंभीर जखमी झालेत जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत. ते चारजण बचावले या भीषण अपघातात जखमी झालेल्या त्या चार जणांनी उडी मारली. साळुंखे रेस्क्यू टीममूळे या चारही जणांना जीवनदान मिळाले आहे. एका पॉईंटवर कार नाश्ता करण्यासाठी त्यांनी थांबवली. मात्र, याचवेळी असलेली दरी लक्षात नाही आली. गाडीचे चाक घसरल्यानंतर चार जणांनी उड्या मारल्यावर डोंगराच्या भागात अडकले पण क्षणार्धात काही समजायच्या आत कार दरीत कोसळली व कारमधील तीन जण मृत्युमुखी पडले,अशी माहिती जखमी झालेल्या रोशन चव्हाण यांनी दिली.