
औरंगाबाद : बाप-लेकीच्या नात्याला काळीमा लागेल अशी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. सावत्र वडिलांनीच सोळा वर्षीय मुलीवर गेली एक वर्षे पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. पीडित मुलगी बाहेर मैत्रिंणींकडे किंवा शिक्षकांकडे वाच्यता करेल म्हणून या नराधम बापाने नंतर तिचे घराबाहेर पडणे देखील बंद केले. परंतु, अत्याचार असह्य झाल्याने अखेर पीडित मुलीने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या नराधमाला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (victim girl dared to file a complaint against the stepfather) या धक्कादायक कृत्याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे कुटूंब लखनऊ येथील आहे. तिचे सावत्र वडील हे पिठाच्या गिरणीवर काम करत होते. आई व लहान चार भावंडे असे त्यांचे कुटुंब शिवाजीनगरमध्ये राहते. दिवसभर गिरणीवर असणारे वडील दुपारी जेवणासाठी घरी यायचे. ते दुपारी घरी आल्यानंतर आई गिरणीवर जायची. क्लिक करा आणि वाचा- मात्र, त्याच दरम्यान वर्षभरापूर्वी वडिलांनी घरी असलेल्या मुलीवर अत्याचार केला. त्याच्या रागाला घाबरणाऱ्या पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितलाच नाही. मात्र, नंतर त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार सुरू केले. तिने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता या सावत्र बापाने पीडित मुलीला बेदम मारहाण केली. क्लिक करा आणि वाचा- मात्र पीडित मुलीने शेवटी केली हिम्मत फेब्रुवारी महिन्यात पिडितेने मात्र हिम्मत करुन आईला हा प्रकार सांगितला. परंतु, त्याची कुणकूण लागल्याने सावत्र बापाने दोघींचेही घराबाहेर पडणे बंद करुन टाकले. शिवाय सर्वांना जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पीडितेने संधी साधत आईच्या मदतीने थेट पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत वडिलांना अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-