
धुळे: आज सायंकाळी शिरपूर कडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सोनगीर टोल नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर त्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. (theree lost lives in the in dhule) मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील सुराय गव्हाणे फाट्याजवळ हा घडला असून भरधाव वेगाने येणारी MH 02 DS 1277 क्रमांक ची व्हरना कार पुढे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कारमध्ये पुढे बसलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सोनगीर गावातील टोल कर्मचारी या धडकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. क्लिक करा आणि वाचा- भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या बाजूला काम करीत असलेल्या टोल कर्मचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. क्लिक करा आणि वाचा- लागलीच नरडाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील मृत टोल कर्मचारी याची ओळख पटली असून, कार मधील दोघांची अजून ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलीस संबंधित कारवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे. क्लिक करा आणि वाचा-