अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग, ट्विटरवरुन चाहत्यांसाठी दिली अपडेट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 24, 2022

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग, ट्विटरवरुन चाहत्यांसाठी दिली अपडेट

https://ift.tt/k3cINCV
मुंबई : यांना पुन्हा करोना लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी ट्विटद्वारे केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी करोना संसर्गाबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना यापूर्वी जुलै २०२० मध्ये करोना संसर्ग झाला होता. आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या १४ व्या पर्वाचं निवेदन करण्याचं काम करत आहेत. सध्या त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु होतं. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं निवेदन करत आहेत. त्यामुळं त्यांना करोना संसर्ग नेमका कसा झाला हे समोर आलं नाही. अमिताभ बच्चन स्वत: च्या प्रकृतीची काळजी घेत असतात. ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करतात. करोना संसर्गाच्या लाटेमध्ये देखील त्यांनी विशेष काळजी घेतली होती. मात्र, त्यांना यापूर्वी करोना संसर्ग झाला होता. एकदा करोना संसर्ग झाला असल्यानं ते विशेष काळजी घेत होते. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीसोबत इतर प्रोजेक्टवर काम करत आहेत. अजय देवगनच्या रनवे ३४ चित्रपटात ते होते. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ब्रह्मास्त्र चित्रपटात देखील ते चाहत्यांना पाहायला मिळतील. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नियमितपणे वेगवगळ्या पोस्ट करत असतात. त्याप्रमाणं त्यांनी करोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे चाहत्यांना दिली आहे. बच्चन यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन केलं आहे. जुलै २०२० मध्ये करोना अमिताभ बच्चन यांना यापूर्वी जुलै २०२० मध्ये करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी ते सुरक्षितता म्हणून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल झाले होते. करोना संसर्गातून बरं झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.