मुंबई : मुंबईतील प्रवाशांना येत्या १५ सप्टेंबरपासून अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईतील टॅक्सी चालक आणि ऑटोरिक्षा चालक १५ सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. टॅक्सी आणि ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. (Mumbai Taximen's Union has warned the government that they will go on an indefinite strike from September 15 if the fare is not hiked) मुंबईतील टॅक्सी चालकांची १० रुपये इतक्या भाडेवाढीची मागणी आहे. तशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ही न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपायांनी कपात केली आहे. मात्र ही कपात कमी असून त्याचा टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत असल्याचे टॅक्सीमेन्स युनियनने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- मार्च २०२१ मध्ये सीएमजीच्या दरात एकूण ३२ रुपयांची वाढ केली गेली. सततच्या दरवाढीमुळे सध्या मुंबईतील टॅक्सी चालकांना रोजचे २५० ते ३०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे, असे क्वाड्रोस यांनी म्हटले आहे. याच कारणामुळे आता सरकारने भाडेवाढीचा निर्णय न घेतल्यास मुंबईतील टॅक्सी चालकांपुढे संपावर जाण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असेही युनियनने पुढे म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे २५ रुपये इतके आहे. त्यात १० रुपयांची वाढ करून ते ३५ रुपये इतके करावे, अशी युनियनची मागणी आहे. क्लिक करा आणि वाचा-