न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 25, 2022

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी

https://ift.tt/B3nHliV
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. वाचा- वाचा- भारत 'अ' संघाच्या कर्णधारपदी प्रियांक पांचाळ याची बुधवारी निवड करण्यात आली. भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यामध्ये तीन चार दिवसीय सामन्यांसाठी निवड करण्यात आली. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या मालिकेला सुरुवात होणार आहे. या संघात ऋतुराजसह कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा या भारतीय वरिष्ठ संघातील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या संघामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकलाही संधी देण्यात आली आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिला आणि तिसरा सामना होणार आहे, तर दुसरा सामना हा हुबळीच्या राजनगर स्टेडियमवर होईल. न्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांनी केली जाणार आहे. ऋतुराजला भारताच्या संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याला गेल्या काही दिवसांमध्ये खेळण्याची संधीच देण्यात आली नाही. झिम्बाब्वेच्या दौऱ्यात तरी ऋतुराजला संधी मिळेल, असे वाटत होते. पण त्याला यावेळी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ऋतुराजची कारकिर्द धोक्यात आल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. आता या मालिकेत त्याला संधी देण्यात आली आहे. या मालिकेत त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली तर त्याचे भारतीय संघातील स्थान कायम राहील. पण जर या मालिकेत त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर त्याचा विचार भारतीय संघासाठी केला जाणार नाही. त्यामुळे ऋतुराजसाठी ही मालिका सर्वात महत्वाची असेल. भारत 'अ' संघ : प्रियांक पांचाळ (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, सर्फराझ खान, तिलक वर्मा, केएस भरत (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चहर, प्रसीध कृष्णा, उमरान मलिक, मुकेश कुमार, यश दयाल, अरझान नागवासवाला.