: उमरगा येथील तहसीलदार राहुल मधुकर पाटील, (वय ४८ वर्षे) यांना आज २० हजाराची लाच स्वीकारताना उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रादाराच्या तक्रारीनंतर उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने योजना आखून सापळा रचला. या सापळ्यात तहसीलदार पाटील पकडले गेले. या प्रकरणाची चर्चा उस्मानाबादेत चांगलीच रंगली आहे. (Umargya tehsildar caught red-handed by anti corruption department) या बाबत अधिक माहिती अशी की, मुरुम येथील तक्रारदारांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे होते. या कामासाठी त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती. म्हणून तक्रारदार हे बुधवारी पंचांसह लोकसेवकाची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी वाळूबाबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर तहसिलदार राहुल पाटील यांनी मध्यस्थीमार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला ५००० रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी २० हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केली होती. क्लिक करा आणि वाचा- यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यानंतर खात्री केल्यानंतर उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार पाटील यांना रंगेहात पकडता यावे यासाठी सापळा रचला. त्यांतर ठरवलेल्या योजनेनुसार सापळा रचून काम सुरू करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- लाचेची २० हजार रुपये रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना तहसीलदार राहुल मधुकर पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. हा सापळा अधिकारी म्हणून उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप निरीक्षक प्रशांत संपते यांनी यशस्वी केला आहे. या सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, विशाल डोके, जाकेर काझी यानी सहभाग नोंदवला आहे. क्लिक करा आणि वाचा-