परळीच्या मैदानातील सामना ट्विटरवर? पंकजा मुंडे धनंजय मुंडेंनी एकाच दिवशी प्रोफाईल फोटो बदलले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 19, 2022

परळीच्या मैदानातील सामना ट्विटरवर? पंकजा मुंडे धनंजय मुंडेंनी एकाच दिवशी प्रोफाईल फोटो बदलले

https://ift.tt/wLUbYW7
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मांजी मंत्री नेते यांची चर्चा असते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपनं राष्ट्रीय राजकारणाची जबाबदारी दिली आहे. तर, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील प्रमुख नेते आहेत. दोन्ही नेते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना राज्यात जसा मोठा वर्ग आहे तसेच त्यांचे चाहते सोशल मीडियावर देखील आहेत. त्यामुळं दोन्ही नेते सातत्यानं समाज माध्यमांचा वापर करत असतात. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलला. पंकजा मुंडे यांनी देखील आजच त्यांच्याही ट्विटर अकाऊंटचा फोटो बदलला. दोन्ही नेत्यांच्या या कृतीमुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही नेत्यांचा मतदासंघ एकच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाची सुरवात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्त्वात झाली. धनंजय मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सध्या वेगवेगळ्या पक्षात आहेत. दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एकच आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा परळीतून विजय मिळवण्याचा निर्धार केलेला आहे. त्यादृष्टीनं त्यांची तयारी सुरु आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळीतून पुन्हा निवडून येण्यासाठी ताकद लावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना सक्रिय ठेवण्यासाठी तर दोन्ही नेत्यांनी ट्विटर फोटो बदलले नाहीत ना, अशा चर्चा सुरु आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी ट्विटरचे प्रोफाईल फोटो बदलले धनंजय मुंडे यांनी त्यांच्या टिवटर खात्याचा प्रोफाईल फोटो बदलला. नेमका आजच पंकजा मुंडे यांनी देखील त्यांच्या ट्विटरचा प्रोफाईल फोटो बदलला. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली. मात्र, दोन्ही नेत्याचं लक्ष हे आगामी विधानसभा निवडणूक असल्याच स्पष्ट होत आहे.