आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; महिलेची रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये प्रसूती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 25, 2022

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; महिलेची रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये प्रसूती

https://ift.tt/E3DXv0U
: उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयात एका महिलेला टॉयलेटमध्ये आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. आज दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. ही घटना म्हणजे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा दाखवणारी घटना असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे प्रसूतीनंतर तब्बल एक तास तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. या महिलेला बेड मिळाला नाही. विशेष म्हणजे ही घटना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याच उस्मानाबाद शहरात घडली आहे. बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची प्रसूती टॉयलेटमध्ये झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (In , a woman had to give birth in a hospital toilet) रुक्मिणी सुतार असे या महिलेचे नाव असून त्या बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथील रहिवासी आहेत. रुक्मिणी सुतार या काल प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु, त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही. दवाखान्यात महिलांची झालेली फुल्ल गर्दी असल्याने त्यांना सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. रुक्मिणी या चकरा मारत होत्या. इतक्यात त्यांना कळा सुरू झाल्यानंतर त्या प्रसाधनगृहात गेल्या. मात्र, तेथेच त्यांनी बाळाला जन्म दिला. क्लिक करा आणि वाचा- एकीकडे रुक्मिणी यांना मुलगा झाल्याचा आनंद असतानाच, दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने टॉयलेटमध्ये प्रसूती झाल्याने आरोग्य यंत्रनेवर टीका होत आहे. क्लिक करा आणि वाचा- या स्त्री रुग्णालयात उस्मानाबाद जिल्हयातील, बार्शी तालुक्यातील, तसेच औसा तालुक्यातील महिला रुग्ण प्रसूतीसाठी डिलीव्हरीसाठी येत असतात. त्यामुळे बेड कमी पडतात. तसेच कर्मचारी संख्या देखील अपुरीच आहे. या रुग्णालयातील बेड वाढवण्याची, तसेच कर्मचारी वाढवण्याची मागणी वारंवार होत आहे. सुदैवाने आरोग्यमंत्री याच जिल्हयातील असल्यामुळे या प्रश्न आरोग्यमंत्री तातडीने सोडवतील का?, असे बोलले जात आहे. क्लिक करा आणि वाचा-