प्रचारावर भाजपने खर्च केले ३४० कोटी, तर काँग्रेसच्या खर्चाचाही आकडा समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 23, 2022

प्रचारावर भाजपने खर्च केले ३४० कोटी, तर काँग्रेसच्या खर्चाचाही आकडा समोर

https://ift.tt/cDirg5k
वृत्तसंस्था, नवी दिल्लीः या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ३४० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला, तर काँग्रेसने या राज्यांत प्रचारासाठी १९४ कोटींहून अधिक रुपये खर्च केले. या दोन पक्षांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या अहवालांतून ही माहिती समोर आली आहे. आयोगाने ही माहिती खुली केली आहे. भाजपने सादर केलेल्या अहवालानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावर पक्षाने ३४० कोटींहून अधिक खर्च केला. यामध्ये उत्तर प्रदेशात २२१ कोटींहून अधिक, मणिपूरमध्ये २३ कोटींहून अधिक, उत्तराखंडमध्ये ४३.६७ कोटी, पंजाबमध्ये ३६ कोटींहून अधिक आणि गोव्यात १९ कोटी रुपये खर्च केल्याचे हा अहवाल दर्शवत आहे. काँग्रेसने सादर केलेल्या अहवालानुसार, पक्षाने पाच राज्यांतील प्रचार आणि त्यासंबंधित गोष्टींसाठी १९४ कोटींहून अधिक रुपये खर्च केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या पक्षांना त्यांच्या निवडणूक खर्चाचे अहवाल निवडणूक आयोगासमोर निर्धारित वेळेत सादर करणे अनिवार्य आहे.