गहलोतांनतर सोनिया गांधींना भेटले, सचिन पायलट यांचं ठरलं, सर्वांसमोरच मिशन सांगितलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 30, 2022

गहलोतांनतर सोनिया गांधींना भेटले, सचिन पायलट यांचं ठरलं, सर्वांसमोरच मिशन सांगितलं

https://ift.tt/ZAHO0Fz
नवी दिल्ली : राजस्थानातील दबावनाट्यानंतर अशोक गहलोत यांनी आज दुपारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. राजस्थानातील आमदारांनी केलेल्या वर्तनाबद्दल माफी मागत असल्याचं त्यांनी म्हटलं. राजस्थानात घडलेल्या प्रकारामुळं व्यथित असल्याचं ते म्हणाले. गहलोत यांच्यानंतर सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ तास बैठक झाली. सोनिया गांधी यांना भेटल्यानंतर बाहेर आल्यावर पत्रकारांनी बैठकीबद्दल विचारल्यानंतर सचिन पायलट यांनी राजस्थान ही माझी प्राथमिकता असल्याचं म्हटलं. सचिन पायट यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत झालेली बैठक महत्त्वाची असल्याचं म्हटलं. पायलट यांच्या अगोदर अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत जयपूरमध्ये आमदारांनी केलेल्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सोनिया गांधी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं ते म्हणाले. यानंतर गहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं. सचिन पायलट यांनी आम्ही आमची बाजू पक्षाच्या अध्यक्षा आणि इतर नेत्यांपुढं मांडली असून त्यांनी आमचं म्हणनं ऐकून घेतलं आहे. आमच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. आम्हाला सर्वांना २०२३ ची निवडणूक एकत्रितपणे लढायच्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसचच सरकार पुन्हा येईल, हा विश्वास आहे. राजस्थान माझी पहिली प्राथमिकता आहे, जो काय निर्णय होईल तो पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी घेतील, असं पायलट म्हणाले. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी सचिन पायलट यांनी आश्वासन दिलं आहे. राजस्थानमध्ये निवडणूक होईपर्यंत अशोक गहलोत मुख्यमंत्री राहणार आहेत. मात्र, निवडणुकीनंतर किंवा त्यापूर्वी सचिन पायलट यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी माहिती आहे. सोनिया गांधी यांना भेटल्यानंतर सचिन पायलट आनंदी दिसून आले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. आता मध्यप्रदेशचं दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या दिग्विजय सिंह हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं आहे. ते बुधवारी केरळमधून दिल्लीत दाखल झाले होते.