धक्कादायक! पुणे FTII मध्ये दुसरी आत्महत्या; तरुणीने घेतला गळफास - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 2, 2022

धक्कादायक! पुणे FTII मध्ये दुसरी आत्महत्या; तरुणीने घेतला गळफास

https://ift.tt/W96KE4p
पुणे: पुण्यातील एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कामाक्षी बोहरा असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची उत्तराखंड येथील राहणारी आहे. डेक्कन पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कामाक्षी बोहरा ही एफटीआयआयमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अ‍ॅक्टींग या कोर्सचे शिक्षण घेत होती. मुळची नैनिताल उत्तराखंड येथील राहणारी आहे. २०१९ पासून येथील वसतीगृहात राहण्यास आहे. ती खोलीमध्ये एकटीच राहत होती. कामाक्षी फारशी कुणामध्ये मिसळत नव्हती. वाचा- आज (गुरुवार) कामाक्षी हिला क्लास होता. मात्र ती क्लासला उपस्थित राहिली नव्हती. ती का आली नाही हे पाहण्यासाठी शिक्षकांनी तिच्या रूमवर पाठवले. त्यावेळी तिने खोलीतील पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेची माहिती डेक्कन पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वाचा- गेल्या महिन्यातही एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे एफटीआयआयमध्ये ही दुसऱ्यांदा आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. विद्येच्या माहेरघरात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढत असून यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात असून मुलांच्या मानसिकतेचा देखील विचार होणे गरजेचे आहे. या प्रकारणी अधिक तपास डेक्कन पोलिसांकडून केला जात आहे.