कोकणातील लोक त्यांना जोकर म्हणून पाहतात; भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 26, 2022

कोकणातील लोक त्यांना जोकर म्हणून पाहतात; भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर हल्ला

https://ift.tt/bMndZVj
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमधील वाकयुद्ध सुरूच असून दोन्ही बाजूंकडील नेते शाब्दिक हल्ले चढवून एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. जळगावमधील एका कार्यक्रमाला गेलेले शिवसेनेचे नेते यांनी माजी मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. वेदांत फोक्सकॉन या प्रकल्पाचे नीट नाव घेता येत नाही, ते रामदास कदम वेदांत पॉपकॉर्न अस बोलत आहेत. रामदास कदम यांची बुद्धिमत्ता काय असेल, रामदास कदम यांना कोकणातील लोक जोकर म्हणून पाहतात, यापेक्षा जास्त महत्व आम्ही त्यांना देत नाही, असा जोरदार टोला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांना लगावला आहे. ( leader criticizes former minister ) चाळीसगाव येथे एकलव्य सेनेचा रविवारी मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. सन २०१४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेला, म्हणजेच एकनाथ शिंदे यांना दिले जाणार होते. त्यामुळेच शिवसेनेतील उपमुख्यमंत्रिपद घेतले नाही, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावर विचारले असता, आम्हाला कुणालाही काही विचारण्याची गरज नाही, माझी शिंदे यांच्यावर फार बोलण्याची इच्छा नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा माईक देवेंद्र फडणवीस खेचत आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं, हे मुख्यमंत्र्यांना गिरीश महाजन सांगत आहेत. अशाप्रकारे भाजपच्या नेत्यांकडून राज्याचे मुख्यमंत्र्यांची अवहेलना केली जात आहे. हे अत्यंत दुदैवी आणि वेदनादायी आहे, अशा शब्दात खरपूस टीका भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांचं तोंड बंद करावं, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. सन २०१४ साली भाजपचे सरकार आले तेव्हापासून अनेक योजना गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर काय राग आहे, हे कळत नाही. वेदान्त असो की इतर अनेक महत्वाचे उद्योग हे गुजरातकडे जात आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केंद्र सरकार वर केला आहे. आहे ते देण्याची दानत नाही, त्यामुळे हे राज्याला काही मोठे देतील यावर जनतेचा विश्वास नाही, अशी टीका सुद्धा भास्कर जाधव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केली. अब्दुल सत्तार यांच्यावर प्रश्न विचारला असता , भास्कर जाधव म्हणाले, खूप मोठ्या माणसाबद्दल प्रश्न विचारला....राज्यात पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा अजिबात चालणार नाही. घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करू असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छोट्या आवाजात सांगतात. खरोखर कारवाई करा, राजकारणासाठी हा विषय चर्चेला ठेवू नका, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिलं. आम्ही कोणाच्या विचारांचा मेळावा घेतो याचे गुलाबराव पाटील यांना काय घेणं देणं आहे? शिवतीर्थ मैदानासाठी तुम्ही न्यायालयात जाता. यावरून बाळासाहेबांबद्दल तुमची किती श्रद्धा आहे हे संपूर्ण जग बघत आहे, असेही जाधव पुढे म्हणाले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत असते. याचाच फायदा भिल्ल समाजाला व्हावा व मदत व्हावी यासाठी मी मेळाव्यासाठी आलो असल्याचेही ते म्हणाले.