
हैदराबाद : भारताने तिसऱ्या सामन्यात दमदार विजय साकारला. या विजयानंतर एक आश्चर्यकार गोष्ट पाहायला मिळाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असे म्हटले जात होते. पण आज सामना संपल्यावर रोहितने चक्क विराटला मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ आता क्रिकेट विश्वात जोरदार व्हायरल होत आहे. सामना संपण्याच्या काही काळ आधी ही गोष्ट मैदानात पाहायला मिळाली. कोहलीने यावेळी ६३ धावांची खेळी साकारली आणि तो बाद झाला. कोहलीला यावेळी अखेरपर्यंत क्रीझवर राहून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. कोहली बाद झाला आणि त्यानंतर तो पेव्हेलियनच्या दिशेने जायला लागला. जेव्हा कोगली पेव्हेलियनमध्ये जायला लागला तेव्हा रोहित खास कोहलीला भेटायला आला. रोहितने यावेळी कोहलीच्या पाठीवर थाप मारली. पण त्यानंतर विराट रोहतबरोबर शिडीवरच बसला. कारण या दोघांनाही भारताचा विजयी क्षण पाहायचा होता. हार्दिक पंड्याने चौकार मारला आणि भारताने विजयासग मालिका जिंकली. हा आनंद विराट आणि रोहित या दोघांनी एकत्रितपणे लुटला. या विजयानंतर दोघेही शिड्यांवरून उठले आणि त्यांनी विजय साजरा केला. यावेळी रोहितने कोहलीला मिठी मारल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी भारताच्या विजयात अँकरची भूमिका बजावली आणि पुन्हा एकदा जुना विराट सर्वांना पाहायला मिळाला. त्याचबरोबर विजयात कोहलीने मोलाचे योगदान दिले होत. त्यामुळे विराटने यावेळी कोहलीला मिठी नारल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोहलीने अहंकार बाजूला ठेवला आणि विजय मिळाला.... सामना संपल्यावर कोहलीने एक खुलासा केला.कोहली म्हणाला की, " रोहित बाद झाल्यावर जेव्हा सूर्या फलंदाजील आला. सूर्या जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा तो चांगलाच सेट वाटत होता. सुरुवातीपासूनच तो मोठे फटके लगावत होता. त्यावेळी आमच्यासाठी धावा महत्वाच्या होत्या. त्यामुळे मी जास्त स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी सूर्याला संधी देणे गरजेचे होते. त्यामुळे मी त्याला जास्त संधी देण्याची तयारी दाखवली. कारण तो चांगले आणि मोठे फटके मारत होता." यानंतर जेव्हा समालोचक चर्चा करत होते, तेव्हा त्यांनी कोहलीने आपला इगो बाजूला ठेवत संघाच्या विजयासाठी मोठे पाऊल उचलले, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्यापेक्षा संघ हा मोठा असतो, हे कोहलीने यावेळी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.