परभणी पुन्हा हादरले; मामाच्या मुलाने मुलीला दाखवले लग्नाचे आमिष, पुढे जे केले ते धक्कादायक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 3, 2022

परभणी पुन्हा हादरले; मामाच्या मुलाने मुलीला दाखवले लग्नाचे आमिष, पुढे जे केले ते धक्कादायक

https://ift.tt/Tv79WBP
: परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागामध्ये दिराने एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा परभणीला हदरवणारी घटना समोर आली आहे. मुलगी अल्पवयीन असताना मामाच्या मुलाने मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (the ) परभणी शहरातील राहणारी एक २१ वर्षीय मुलगी १७ वर्षांची असताना मामाच्या मुलाने या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. आणि मुलीची इच्छा नसतानाही मुली सोबत शारीरिक संबंध ठेवले. याचबरोबर मामाच्या आरोपी मुलाने मुलगी अल्पवयीन असताना आणि मुलगी वयात आल्यानंतरही तिच्यावर अत्याचार केला. अखेर अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने नानालपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून मामाच्या २३ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- तर, काल परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागामध्ये राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय विधवा महिलेवर दिराने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडण्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच आता मामाच्या मुलाने लग्नाची आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केल्याने या दोन्ही घटनेने परभणीमध्ये खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परभणीत महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दोन्ही प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेच्या अधिक तपास करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-