फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांना मारहाण,कल्याणमधील धक्कादायक प्रकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 13, 2022

फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांना मारहाण,कल्याणमधील धक्कादायक प्रकार

https://ift.tt/5yZtiMd
कल्याणः कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जे.पी. पोस्टर मैदानावर फुटबॉल खेळण्यास आलेल्या शाळकरी मुलांना सात - आठ जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मोटारसायकल उभ्या करताना झालेल्या नुकसानीचा वादातून ही मारहाण झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात राजेश केणे, मुकेश भधोरीया, योगेश केणे, मनोज केणे, निलेश केणे यांसह इतर दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाड पूर्व येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार १७ वर्षीय मुलगा व त्याचे मित्र हे गौरीपाडा येथील जे.पी. पोस्टर मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी मंगळवारी रात्री गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या दुचाकी या ऑटो झोन कार्यशाळेच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केल्या होत्या. दुचाकी पडल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजेश केणे याला दुचाकी कशा पडल्या याविषयी विचारणा केली. वाचाः राजेशला याचा राग आल्याने त्याने विचारणा करणाऱ्या मुलाला मारहाण सुरू केली. आम्ही फक्त विचारणा करतोय तुम्ही मारहाण कशासाठी करता अशी मुले विचारत असताना एका मुलाने आपल्या पालकांना संपर्क करुन मैदानावर मारहाण होत असल्याचे कळविले. वडिलांना का कळविले म्हणून राजेशने अन्य एका शाळकरी मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजेशने आपल्या मित्रांना मैदानात बोलावून घेतले. यावेळी त्या सर्व सात ते आठ जणांनी मिळून मैदानात खेळत असलेल्या मुलांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर तेथून त्यांनी पळ काढला. मुलाच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करत मुलांचा शोध सुरु केला आहे. वाचाः