
परभणी: वडिलांना महानगरपालिकेत कामावर सोडून मुलाने राहटी येथील पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यू झालेल्या पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह आज गुरुवार १३ ऑक्टोबर रोजी सापडला आहे. गणेश आनंदराव कोळशिकवार असे मृत्यू झालेल्या २५ वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परभणी शहरातील जुना पेडगाव रोडवरील प्रभावती नगर मध्ये राहणाऱ्या गणेश कोळशिकवार या युवकाने वडील आनंदराव कोळशिकवार यांना महानगरपालिकेमध्ये गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी आणून सोडले. त्यानंतर युवक परभणी वसमत रोडवरील राहटी येथील पुलावर गेला या ठिकाणी गणेश कोळशिकवार याने महाविद्यालयाचे आयकार्ड, दुचाकी आणि आपला मोबाईल ठेवून पूर्णा नदीपात्रामध्ये उडी टाकली. हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी याची माहिती ताडकळस पोलिसांना दिली. हेही वाचा - पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांना तुमच्या मुलाची दुचाकी आणि मोबाईल या ठिकाणी असल्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासूनच गणेश कोळशिकवार याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सात दिवस शोध घेऊनही गणेश कोळशिकवार याचा मृतदेह आढळून आला नाही. हेही वाचा - अखेर आज पूर्णा तालुक्यातील निवळी येथे एका गुराख्याला पूर्णा नदी पात्रामध्ये एक मृतदेह दिसून आला. त्याने याची माहिती गावच्या सरपंचाला दिली. त्यानंतर गावच्या सरपंचांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरील युवक गणेश कोळशिकवार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी याची माहिती गणेशाच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी खात्री केल्यानंतर मृतदेह गणेशचा असल्याचं निष्पन्न झालं आहे. तब्बल सात दिवसानंतर मुलाचा मृतदेह आढळून आला असल्याने मुलगा परत येईल या आशेवर बसलेल्या कोळशिकवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा -