
मेलबर्न: एका वर्षापूर्वी दुबईत झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता आणि त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. पहिल्या सामन्यात झालेल्या या पराभवामुळे भारताला पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले होते. पण एका वर्षानंतर टीम इंडियाने बाजी पलटली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकला. या एका विजयामुळे स्पर्धेत कोणालाही न जमलेली कामगिरी रोहित आणि कंपनीने करून दाखवली आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत ग्रुप २ मध्ये आहे. यात भारतासह पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेदलँड, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे. भारतासाठी ग्रुपमधील कठीण सामने हे दोनच होते. एक पाकिस्तान आणि दुसरा द.आफ्रिकेविरुद्ध होय. यातील पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने जिंकला आहे. या एका विजयामुळे भारताचे थेट सेमीफायनलचे स्थान निश्चित झाले आहे. कारण यापुढील लढतीत भारताचा फार तर फार एका सामन्यात (द.आफ्रिका) पराभव होऊ शकतो. उर्वरित संघांना पराभव करण्याची क्षमता भारतात आहे आणि ते संघ फार मोठा उलटफेर करणार नाहीत. तसा फार उलटफेर झालाच तरी भारताचे दुसरे स्थान कुठेच जाणार नाही. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून थेट सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वाचा- या उटल ग्रुप १ मध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सेमीफायनलची चुरस ही अधिक आहे. ग्रुपमधून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिघांच्या सर्वाधिक टक्कर असेल. ग्रुपमधील दोनच संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार असल्याने प्रत्येकासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. वाचा- या तुलनेत भारताचा विचार केल्यास टीम इंडियाची पुढील लढत नेदलँडविरुद्ध आहे. या सामन्यात धक्कादायक निकाल लागणार नाही. त्यानंतरची लढत ३० ऑक्टोबर रोजी द.आफ्रिकेविरुद्ध आहे. या लढतीत भारताची बाजू वर आहे कारण टीम इंडियाने वर्ल्डकपच्या आधी टी-२० मालिकेत आफ्रिकेचा पराभव केला होता. अर्थात या सामन्याचा निकाल भारताच्या विरुद्ध जरी केला तरी बांगलादेश आणि त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या लढती टीम इंडियाच्या सध्याची कामगिरी पाहता जड जाणार नाहीत. त्यामुळे भारताचे ग्रुपमधील दुसरे स्थान कुठेच जाणार नाही.