करवाचौथला गर्लफ्रेंडला शॉपिंगला घेऊन गेला, पत्नीने कहर केला, भरबाजारात दे दणादण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 14, 2022

करवाचौथला गर्लफ्रेंडला शॉपिंगला घेऊन गेला, पत्नीने कहर केला, भरबाजारात दे दणादण...

https://ift.tt/eaR46Gx
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये करवाचौथच्या दिवशी एक विवाहित व्यक्ती आपल्या प्रेयसीला शॉपिंगसाठी घेऊन गेला होता. यादरम्यान पत्नीने त्याला पाहिले आणि तिचा पारा चढला. यानंतर महिलेने घरच्यांना बोलावून पती आणि त्याच्या प्रेयसीला भरबाजारात मारहाण केली. बाजारात झालेल्या या गोंधळानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गाझियाबादच्या कोतवाली भागातील तुराब नगर मार्केटचे आहे. करवाचौथच्या दिवशी एक तरुण आपल्या बायकोऐवजी आपल्या प्रेयसीला शॉपिंगसाठी घेऊन गेला होता. त्याचवेळी तरुणाची पत्नीही खरेदीसाठी बाजारात पोहोचली. तरुणाच्या पत्नीने पतीला दुसऱ्या महिलेसाठी खरेदी करताना पाहिले तेव्हा ती संतापली. हेही वाचा - यानंतर महिलेने तिच्या कुटुंबीयांना बोलावून पतीला चांगलच बदडलं. बाजारपेठेत गोंधळ वाढल्यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी लोकांनी मोबाईलवरुन व्हिडिओ बनवले. महिलेने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली याप्रकरणी तुराबनगर मार्केटमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात विवाहित व्यक्ती आपल्या मैत्रिणीसोबत खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या पत्नीने पतीविरोधात लेखी तक्रार दिली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. हेही वाचा - सीओ अंशू जैन यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेने सांगितले की, तिचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. पतीसोबत तिचा वाद सुरु होता. हे प्रकरण न्यायालयात आहे. तिचा नवरा दुसर्‍या मुलीसाठी खरेदी करत होता जे आज रंगेहात पकडले गेले. तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हेही वाचा -