Google कंपनीला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मोठा फटका, भरावा लागणार कोटींचा दंड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 26, 2022

Google कंपनीला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मोठा फटका, भरावा लागणार कोटींचा दंड

https://ift.tt/2kdHDWz
नवी दिल्ली : प्ले स्टोअरवर स्वतःच्या पेमेंट अॅपची प्रसिद्धी करताना अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्या प्रकरणी अल्फाबेट इन्कॉर्पोरेशनच्या 'गुगल'ला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) मंगळवारी ९३६.४४ कोटी रुपये दंड ठोठावला. एकाच महिन्यात 'गुगल'ला भारतीय स्पर्धा आयोगाने दुसऱ्यांदा दंड ठोठावला आहे. 'गुगल'ला मंगळवारी ठोठावण्यात आलेला दंड हा मुख्यतः स्वतःचे अतिरंजित प्रतिमावर्धन केल्याप्रकरणी आहे. हा दंड ठोठावतानाच 'गुगल'ने अनुचित व्यापार प्रथा तत्काळ थांबवाव्यात, असे आदेशही स्पर्धा आयोगाने दिले आहेत. यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी सीसीआयने गुगलला १,३३७.७६ कोटी रुपये दंड आकारला होता. 'गुगल'ने अॅण्ड्रॉइड मोबाइल उपकरणांसंदर्भात स्वतःचे प्रतिमावर्धन अनुचित व्यापार प्रथेचा आधार घेत केल्याबद्दल हा दंड सीसीआयने ठोठावला होता. सीसीआयचे म्हणणे काय? यासंदर्भात सीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिलेल्या मुदतीत गुगलने आपला कारभार सुधारावा. बिलिंग किंवा पेमेंट प्रोसेसिंग सेवा मोबाइलवर उपलब्ध करून देण्यासाठी एखादी कंपनी उत्सुक असेल तर तिला गुगल अटकाव करू शकत नाही. तसेच या प्रकारच्या सेवेसाठी अॅप खरेदी करणे किंवा अॅपमधून सशुल्क सेवा देणे या दोन्ही गोष्टींना गुगल स्वतःच्या पेमेंट अॅपच्या प्रसारासाठी मज्जाव करू शकत नाही, असेही सीसीआयने गुगलला बजावले आहे.