
पाटणा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Jairam Ramesh) यांनी पाटण्यात मोठे वक्तव्य केले आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा करताना ते म्हणाले की, देशभरात राहुल गांधींनंतर (Rahul Gandhi) काँग्रेसमध्ये जर कोणी लोकप्रिय नेता असेल तर तो (Kanhaiya Kumar) आहे. जयराम रमेश हे वक्तव्य करत असताना त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह बिहार काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते. जयराम रमेश म्हणाले की, लोकांना कन्हैया कुमार काय सांगतो हे ऐकायचे आहे. या तरुण नेत्याला सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनंतर कन्हैया कुमारला सर्वाधिक मागणी असल्याचे ते म्हणाले. ( is most popular leader after says ) जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले की, कन्हैया कुमारची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. प्रत्येकाला त्याला बघायचं असतं, ऐकायचं असतं. लोकांना तो आवडतो. त्याच्यासाठी देशभरातून मागणी येत आहे. भारत जोडो यात्रेसाठी यांच्यानंतर काँग्रेस पक्षात कन्हैया कुमार हा दुसरा सर्वात लोकप्रिय नेता आहे. जयराम रमेश पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने आतापर्यंत जवळपास ५५ टक्के अंतर कापले आहे. या प्रवासात राहुल गांधींनंतरचा सर्वात लोकप्रिय नेता म्हणजे कन्हैया कुमार. देशात सर्वत्र कन्हैया कुमारला बोलावले जात आहे. ते म्हणाले की, आत्तापर्यंत ६७ दिवसांत पाच राज्यांतील २७ जिल्ह्यांतून गेली आहे. कन्हैया कुमारला सर्वत्र पसंती मिळाली आहे. जयराम रमेश पुढे म्हणाले की, बिहारमध्येही भारत जोडो यात्रा सुरू होत आहे. २८ डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही यात्रा बिहारमधील बांका येथून सुरू होईल आणि बोधगया येथे संपेल. एकूण १७ जिल्ह्यांतून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान एकूण १२०० किमी अंतर कापले जाईल. बिहारमध्ये होणाऱ्या या यात्रेत राहुल गांधी सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेत राज्यातील सर्व नेते सहभागी होणार आहेत.