जाडेजाच्या पत्नीला भाजपची उमेदवारी, बहिणीचं नाव काँग्रेसकडून चर्चेत, नणंद भावजय भिडणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 14, 2022

जाडेजाच्या पत्नीला भाजपची उमेदवारी, बहिणीचं नाव काँग्रेसकडून चर्चेत, नणंद भावजय भिडणार?

https://ift.tt/59de1Ii
अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. १ डिसेंबरला ८९ जागा तर ५ डिसेंबरला ९३ जागांवर मतदान होणार आहे. यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेस आणि आपचं आव्हान आहे. आपचे अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये तळ ठोकलाय. भाजपनं पहिल्या बहुतांश उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. निवडणूक म्हटलं की राजकीय घराण्यांमध्ये फाटाफूट होते, हे समीकरण ठरलेलंच आहे. गुजरातमधील जामनगर उत्तर हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा जामनगरहून उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून लढणार आहे. रिवाबा जाडेजानं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसकडून रविंद्र जाडेजा बहीण नैना जाडेजाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं टीम इंडियाचा क्रिकेटर कात्रीत अडकला आहे. नणंद भावजय अशी लढत? गुजरातमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळवायची आहे. जामनगर उत्तरमधून रिवाबा जाडेजाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रवींद्र जाडेजाच्या वडिलांनी आणि बहिणीनं काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नैना जाडेजा देखील जामनगर उत्तरमध्ये लोकप्रिय आहेत. काँग्रेसकडून रवींद्र जाडेजाच्या बहिणीला उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळं टीम इंडियाचा स्टार खेळाडू निवडणुकीत पत्नीचा प्रचार करणार की बहिणीचा प्रचार करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसनं नैना जाडेजांना उमेदवारी दिल्यास जामनगर उत्तरमध्ये नणंद भावजय अशी लढत होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये तिरंगी लढत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गुजरातमध्ये १९९८ पासून भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी २०२२ ची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळवायची आहे. त्यामुळं २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून बालेकिल्ला मजबूत करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आहे. गुजरातमध्ये भाजपसमोर पाररंपारिक विरोधक काँग्रेस सोबत आपचं आव्हान आहे.