नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पालममध्ये बुधवारी एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने थेट आपल्या बहिणी, वडील आणि आजीची चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही सर्व हत्या त्याने घरातच केल्याचे बोलले जात आहे. पालममध्ये आपल्याच कुटुंबातील ४ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीबाबत अधिक माहिती समोर आली आहे. तो वेडा होता आणि त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. घरातल्या झालेल्या शुल्लक गोष्टीवरून त्याने हा गुन्हा केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कुठेतरी या नशेच्या आहारी गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हत्येवेळीदेखील तो दारूच्या नशेत होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आता पुढील चौकशी सुरू आहे. तर कुटुंबातील चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
https://ift.tt/ovaMbBY